डायल 112 (महाराष्ट्र राज्य आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली) बाबत माहिती

डायल 112 (महाराष्ट्र राज्य आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली) बाबत माहिती
1) डायल 112 प्रकल्प नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये दिनांक 04/09/2021 रोजीपासुन कार्यान्वित करण्यात आला आहे.
2) डायल 112 प्रकल्पाकरीता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष येथे 12 डिस्पॅचर व 01 सुपरवायझर यांचेकरीता एकुण 13 संगणकाची उभारणी करण्यात आली आहे.
3) 2021 मध्ये नियंत्रण कक्ष येथील कार्यरत 04 पोलीस अधिकारी यांना पर्यवेक्षक (सुपरवायझर) व 13 पोलीस अंमलदार यांना प्रेषक (डिस्पॅचर) तसेच पोलीस ठाणेमध्ये कार्यरत पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार या संवर्गातील एकुण 1064 पोलीस अंमदार यांना प्रतिसादक (रिस्पॉन्डर) चे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
4) डायल 112 प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास नवी मुंबई आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष येथे महिंद्रा डिफेन्स सिस्टिम लिमिटेड कंपनी यांच्यातर्फे नियुक्त केलेले तांत्रिक प्रतिनिधी सकाळी 08:00 व रात्री 22:00 पर्यत उपलब्ध असतात तसेच 22:00 वाजेनंतर प्राथमिक संपर्क केंद्र येथील तांत्रिक अधिकारी फोनवर उपलब्ध असतात.
5) चारचाकी 35 व दुचाकी 41 एम.डि.टी. ची उभारणी करण्यात आली आहे.
6) 2023 मध्ये डायल 112 चे प्रशिक्षण नियंत्रण कक्ष येथील कार्यरत 07 पोलीस अधिकारी यांना पर्यवेक्षक (सुपरवायझर) व 22 पोलीस अंमलदार यांना प्रेक्षक (डिस्पॅचर) तसेच पोलीस ठाणेमध्ये कार्यरत पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार या संवर्गातील एकुण 160 पोलीस अंमदार यांना प्रतिसादक (रिस्पॉन्डर) चे प्रशिक्षण देण्यात आले आहे.