ई-चलन

ई-चलन
नवी मुंबई वाहतूक विभाग हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय आहे ज्याने 2015 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यानां ई-चलन आकारले. गृह विभाग, महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई वाहतूक पोलिसांना पूर्णपणे स्वयंचलित करण्यासाठी ई-चलन प्रणालीसह सक्षम केले आहे. संपूर्ण नवी मुंबई शहरात वाहतूकीच्या दंडाची अंमलबजावणी ई-चलन प्रणालीद्वारे केली जाते तसेच नवी मुंबई शहरावर देखरेख ठेवणा-या प्रकल्पाचे सीसीटीव्ही आणि स्पीड कॅमेऱ्यांचे एकत्रिकरण केले आहे. सध्या सायन-पनवेल महामार्गावर स्पीड कॅमेरे बसवण्यात आले आहेत.