सोशल मीडियाद्वारे 24X7 नागरिकांची मदत

सोशल मीडियाद्वारे 24X7 नागरिकांची मदत
नागरिकांकडे इन्टरनेट कनेक्टेड स्मार्टफोन उपलब्ध असल्याने ते सोशल मीडियाबरोबर जोडले गेले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील आमच्या उपस्थितीपासून दूर राहू शकत नाही. नवी मुंबई पोलीस सोशल मीडियावर सक्रिय असून पोलीसांशी संबंधित विविध समस्यांवर नागरिकांना मदत करत आहेत. @Navimumpolice twitter हँडलचे 189K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि नवी मुंबई पोलीस फेसबुक पेजचे 11K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि navimumbaipolice Instagram अकाउंटवर 5.5K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. नवी मुंबई पोलीस मुख्यालयात समर्पित सोशल मीडिया टीम नेटिझन्सच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि शक्य ती सर्व मदत देण्यासाठी 24X7 उपलब्ध आहे.