आय-बाईक

आय-बाईक
कोणत्याही घडलेल्या गुन्ह्याचा तपास करणे हे पोलीस खात्याचे एक अत्यंत महत्वाचे काम आहे. एखादी घटना/गुन्हा घडताच पोलीसांकडे माहिती/तक्रार दिली जाते. त्यानुसार पोलीस अधिकारी/अंमलदार गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देतात अथवा तक्रारदार पोलीस ठाण्यात येऊन त्यांची तक्रार नोंदवितात.
कोणत्याही तपासात गुन्ह्याच्या घटनास्थळास अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळाचा पंचनामा करणे, तेथे मिळालेले भौतिक, रासायनिक, जैविक आणि परिस्थीतीजन्य पुरावे जमा करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासाचे प्रक्रियेत आणि तदनुषंगाने कायदेशीर कार्यवाहीत गुन्ह्याचे घटनास्थळाचे छायाचित्रण आणि चलचित्रण हे देखील तितकेच महत्वाचे ठरते.
आय-बाईक अर्थात ”इन्वेस्टीगेशन बाईक” ही संकल्पना आय-कार या संकल्पनेचा विस्तार म्हणुन राबविण्यात येईल. या करिता एक दुचाकी, सरंजामाची (किट) बॅग, डीजीटल कॅमेरा, जॅकेट आणि हेल्मेट पुरविण्यात येतील. सर्व अधिकारी व अंमलदार यांना न्यायसहाय्यक वैद्यकिय प्रयोगशाळेमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल.