सावली इमारत

सावली इमारत
श्री. मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे संकल्पनेतून दिनांक 11/05/2023 रोजी मा. श्री.देवेंन्द्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते सावली इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. पत्ता- सावली बिल्डींग, पहिला मजला, सेक्टर 05, अय्यप्पा रोड, नेरूळ, नवी मुंबई 400706 सावली इमारतीमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम खालील प्रमाणे आहेत.
1) महिला सहाय्य कक्षः-
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कौटुंबिक हिंसाचार/घरगुती कलहातुन निर्माण होणा-या समस्यांचे निराकरण केले जाते. तसेच पती-पत्नी यांचे समुपदेशन व मार्गदर्शन करून जास्तीत जास्त संसार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच खालील नमुद फाईलचे कामकाज चालते.
अ) महीला शासकीय सुरक्षा समिती
ब) विशाखा समिती
क) कम्युनिटी पोलीसिंग
ड) टास्कफोर्स
इ) मनोधैर्य योजना
ई) महीला सहाय्य कक्ष
ग) महिला समुपदेशन केंद्र (वाशी, खारघर, पनवेल)
फ) हिरकणी कक्ष
ज) जनजागृती कार्यक्रम
2) महिला संबंधित गुन्हयांचे प्रषिक्षण देण्याकरीता हॉलः-
आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार यांना महिलांसंबंधित गुन्हयांचे प्रशिक्षण देण्याकरीता प्रशिक्षण हॉल आहे.
3) पिडीत व निराधार महिलांकरीता तात्पुरता निवाराः-
पिडीत व निराधार महिला व मुलींकरीता तात्पुरत्या स्वरूपामध्ये सर्व सुविधा असलेली राहण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे.
4) सायबर पोलीस ठाणेः-
सायबर गुन्हयांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सायबर फसवणुकीबाबत तक्रार नोंद करून घेवुन त्याचे निरासन करणेसाठी सायबर पोलीस ठाणेची स्थापना करण्यात आली आहे.