महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ हा एक क्रांतिकारी कायदा आहे. या कायद्यान्वये नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत सेवा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाचे प्रमुख राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आहेत.
या कायद्यांतर्गत कोणत्या सेवा उपलब्ध आहेत हे नागरिक आपल्या सरकार पोर्टल किंवा मोबाईल ॲपवर तपासू शकतात.
सेवा मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कृपया आपल्या सरकार अधिकृत पोर्टलला भेट द्या:
लोकसेवा हक्क अधिनियमाशी संबंधित अधिकृत पुस्तिका आणि पोर्टल
अधिसूचित सेवा, सरकारी नियम आणि निर्देश
नवी मुंबई पोलीस विभागाची बांधिलकी आणि मानके दर्शवणारी अधिकृत नागरिकांची सनद पहा.